NCT NCT जयहिंद सेनेच्या वतीने दुय्यम निबंधकांना विविध मागण्यांचे निवेदन,मागण्या मान्य न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार - चंदनदादा चव्हाण

जयहिंद सेनेच्या वतीने दुय्यम निबंधकांना विविध मागण्यांचे निवेदन,मागण्या मान्य न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार - चंदनदादा चव्हाण

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे ):- जयहिंद सेना महाराष्ट्र राज्य या पक्षाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दुय्यम निबंधक श्रेणी १ चे विनायक सोलनकर यांना देण्यात आले.यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष चंदनदादा चव्हाणसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                           या दिलेल्या निवेदनात असे म्हणण्यात आले आहे की जनतेच्या माहितीसाठी तुकडेबंदी कायद्याची एसओपी अर्थात नियमावली कार्यालयाच्या बाहेर फलकावर तात्काळ लावण्यात यावी,कार्यालयाच्या कामात पारदर्शकता येण्यासाठी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, कायद्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासनाने सक्रिय पाऊले उचलावीत, कार्यालयात खासगी दलालांचा वावर तात्काळ थांबवावा, दस्तऐवजाच्या टोकनसाठी २०० रुपये फी आकारुनही त्याची पावती दिली जात नाही ते तात्काळ थाबवावे. यासारख्या विविध मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास सदर कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण, जयहिंद गुंठेवारी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामदास सावंत, तालुकाध्यक्ष आदर्श नलवडे, शहरप्रमुख सुनील कांबळे, मिरज शहर प्रमुख हुसेन शेख, मोहम्मद शिंदे, गौरव भोसले सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      फोटो :- जयहिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांच्या हस्ते कवठेमहंकाळ दुय्यम निबंधक श्रेणी -१ चे विनायक सोलनकर यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.सोबत रामदास सावंत व इतर