NCT NCT जादूटोणा विरहीत चालणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय - हभप अविनाश भारती

जादूटोणा विरहीत चालणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय - हभप अविनाश भारती

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- वारकरी संप्रदायात जादूटोणाला अजिबात थारा नसून येथे केवळ निखळ भक्तीमार्गचा अवलंब केला जातो असे प्रतिपादन हभप अविनाश भारती महाराज-घाटनांदुर यांनी घाटनांद्रे (ता कवठेमहांकळ) येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यातील चौथ्या दिवशीच्या किर्तन सोहळ्यात आपली किर्तन सेवा बजावताना केले.    यावेळी ते पुढे म्हणाले की जशी येईल तशी पांडुरंगाची भक्ती केली पाहिजे त्यातच जिवनाचे सार्थक असुन त्यासाठी केवळ टाळ,चिपळी व मृदंग याच धनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.दोन तास चांगलेल्या किर्तन सोहळ्यात त्यांनी सांप्रदायाला आधुनिकतेची जोड देत उपस्थित भाविक भक्तांना चांगलेच खेळवून ठेवले.
                         सदर किर्तनास मृदंग वादक म्हणून हभप कृष्णा साळुंखे महाराज (जालना) व हभप विशाल रोंगे महाराज (सोलापूर) यांनी तर गायन साथ  हभप शंकर महाराज अनपट-जालना यांनी केली.तर व्यासपीठ चालक म्हणून हभप विठ्ठल पाटील महाराज शेटफळे-करमाळा यांनी काम पाहिले.
फोटो  :- १) घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे पारायणा सोहळ्यात किर्तन सेवा बजावताना हभप अविनाश भारती महाराज-घाटनांदुर.२) समोर उपस्थित भाविकवर्ग