नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):-सालाबादप्रमाणे याही वर्षी तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथील श्री सिध्दनाथ देवाची यात्रा ही बुधवार दिनांक १ एप्रिल पासून भरणार असून,यात्रेनिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक, सांस्कृतिक व कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन केले आहे. तरी याचा तमाम भाविक भक्तांनी, खेळणीवाले,पाळणे वाले,मिठाईवाले व कुस्ती शौकीनानी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. बुधवार दिनांक १ एप्रिल रोजी देवाचा हार जागर असून या दिवशी देवीची विधिवत पूजा अर्चा केली जाणार आहे.गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी श्रीची बोनी व नैवेद्य आहे.तर शुक्रवार दिनांक ३ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून सदर दिवशी सकाळी नऊ वाजता कमल वनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.तसेच दुपारी तीन वाजता महाप्रसादाचे वाटप होणार आहे.तर पाच वाजता मंदिर लगतच कुस्त्यांचे मैदान होणार असून यामध्ये अनेक लहानमोठ्या चटकदार कुस्त्या पहावयास मिळणार आहेत.तसेच सायंकाळी सात वाजता झंकार बिट्स म्युझिकल नाईट ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.
फोटो :- तिसंगी (ता कवठेमहांकाळ) येथील पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिर व इंन्सेट मध्ये श्रीची मूर्ती.फोटो - जालिंदर शिंदे
