नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ ) परिसरात काल गुरुवार दिनांक १९ रोजी दुपारी पाऊणे दोन वाजण्याच्या सुमारास गारासह दमदार पाऊस झाला असून,सदर पाऊस सुमारे पाऊण तास पडत होता. त्यामुळे बळीराजाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यापरिसरातील ऐंशी टक्के द्राक्ष हंगाम हा पुर्ण झाला असून, अद्यापही वीस टक्के द्राक्ष बाग शिल्लक आहेत. या पाऊसाने विक्रीयोग्य तयार झालेले द्राक्ष मणी हे फुटण्याची भीती असुन, रब्बी पिकेही बळीराजाने काढून ती मळणीसाठी रानात तयार ठेवली असुन, ती या पाऊसाने भिजून काळी पडण्याची भीती बळीराजा व्यक्त करत आहे रानातील काढून ठेवलेल्या वैरणीही काळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फोटो :-घाटनांद्रेत गारांसह दमदार पाऊस झाला.फोटो - जालिंदर शिंदे
