नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-व्हॉईस ऑफ मिडिया, व्हिओएम इंटरनॅशनल फोरम मुंबई, दिल्ली यांचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेच्या वतीने आज राज्यात ठिकठिकाणी तालुकास्तरावर विविध मागण्यांचे निवेदन प्रांत तसेच तहसीलदार यांना देण्यात आले. कवठेमहांकाळ तालुका व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक २३ मार्च रोजी जनमाहिती अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार संजय पवार यांना पत्रकारांच्या विविध मागण्या विषयी निवेदन देण्यात आले. वृत्तपत्र उद्योग हा केवळ व्यवसाय नसून तो लोकशाहीचा पाया आहे. जर आर्थिक अडचणीमुळे हा उद्योग कमकुवत झाला,तर त्याचा थेट परिणाम जनतेच्या माहितीच्या अधिकारावर होईल त्यामुळे वरील सर्व मागण्या तातडीने मान्य करून योग्य तो शासन निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी विजय कांबळे, सचिन गायकवाड, इमाम मुल्ला व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेचे तानाजी शिंगाडे, रामचंद्र कोरे,अमित कांबळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
