नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):-महाराष्ट्र शासनाच्या सन २०२०-२१ सालच्या राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने विकास माने-पाटील यांना सन्मानित करण्यात आले.पुणे येथे पार पडलेल्या एका भरगच्च अश्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित (दादा) पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार विकास माने-पाटील यांना प्रदान करण्यात आला. विकास माने-पाटील यांनी सदर कालावधी मध्ये नांगोळे, लंगरपेठ,आगळगाव येथे केलेल्या अगदी उत्कृष्ट विकास कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन २०२०-२१ सालचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.विकास माने-पाटील यांनी नांगोळे, लंगरपेठ,आगळगाव येथे केले विविध विकास कामाची शासनाकडून योग्य ती दखल घेण्यात आली होती. त्यांनी सन २००६ ते १० याकालावधीत केरेवाडी शेळकेवाडी, आगळगाव येथे निर्मल ग्राम, तंटामुक्त गाव, आदर्श दलित वस्ती, संत गाडगेबाबा अभियानामध्ये उत्कृष्ट पारितोषिकेही प्राप्त केली होती.त्यानंतर २०१० ते २१ या कालावधीत नांगोळे येथे अतिशय उत्कृष्ट कामकाज करून स्मार्ट ग्राम, संत गाडगेबाबा अभियानासाठी त्यांनी तेथे मुहूर्तमेढ रोवली.नांगोळे येथे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना,वसंत घरकुल योजना,तांडा वस्ती सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना, आदर्श उद्यान, आदर्श ग्रामपंचायत इमारत, आदर्श कुस्ती मैदान, आदर्श स्मशानभूमी, आदर्श प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पर्यटन क्षेत्र विकास योजना, नरेगा योजना, बिहार पॅटर्न वृक्ष लागवड, जलबिरादरी, जलसंधारणाची, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते दळण वळण यासारख्या उत्कृष्ट पायाभूत सुविधा व भौतिक सुविधा नांगोळे या गावात उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर शासनाच्या प्रत्येक वैयक्तिक व सामूहिक योजनेचा लाभ नांगोळे गावात नागरिकांना त्यांनी उपलब्ध करून दिला. लंगरपेठ येथे सन २०१८ ते कार्यरत आहेत.सध्या लंगरपेठ हे गाव स्मार्ट काम योजनेसाठी जिल्हास्तरीय ५० लाख वर्षासाठी पात्र झाले आहे. माझी वसुंधरा ४.० व ५.० मध्ये उत्कृष्ट कामगिरी त्यांनी करून दाखवून राज्य शासनाकडून एक कोटीचे बक्षीस प्राप्त केले आहे. सध्या ते ढालगाव येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
