नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ वार्ताहर प्रतिनिधी (रामचंद्र कोरे- माळी):-२०११ नंतर यावर्षी जनगननेची प्रक्रिया संपूर्ण देशभरात मोठ्या धूमधडाक्यात चालू झाली आहे.या प्रक्रियेचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात 2027साठी संपूर्ण राज्यभर जनगणना प्रशिक्षण सुरू झाले असून जनगनेची माहिती संकलन मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी प्रत्येक प्रगनाकडे किमान अँड्रॉइड 12 वर्जन चा मोबाईल असणे आवश्यक आहे यामुळे अनेक शिक्षकांना आर्थिक धोंड बसणार आहे. या जनगणना प्रशिक्षणामध्ये जिल्हा परिषद शिक्षक, हायस्कूल शिक्षक तसेच अनेक अधिकारी सहभागी झाले आहेत येथील माहिती "सेन्सस 2027 " या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे माहिती संकलित केली जाणार आहे, हे काम अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर होणार असले तरी अँड्रॉइड 12 अपडेट असलेला मोबाईल आवश्यक असल्याच्या सूचना वरिष्ठाकडून आलेले आहेत. सर्वच शिक्षकांच्याकडे 12 व्हर्जिन मोबाईल नसल्यामुळे अनेकांना हा आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे या जन गणनेमध्ये शिक्षक देखील सहभागी आहेत तरी शासनाने या जनगणनेच्या कामासाठी लागणारा 12 वर्जन अँड्रॉइड मोबाईल फोन 62 साठी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिक्षक नेते शिवाजी ओलेकर यांनी केली आहे यावेळी राजू सुतार, संभाजी वलेकर, इत्यादी उपस्थित होते.
