NCT NCT रविवार पासून घाटनांद्रेत श्री सिध्दनाथ देवाची यात्रा

रविवार पासून घाटनांद्रेत श्री सिध्दनाथ देवाची यात्रा

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- रविवार दिनांक १९ एप्रिल पासून घाटनांद्रे (ता कवठेमहांकळ) येथील श्री सिध्दनाथ देवाची यात्रा भरणार असून,यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी,खेळणीवाले, पाळणेवाले,मिठाईवाले व समस्त व्यापारी वर्गांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.                                                                   रविवार दिनांक १९ एप्रिल रोजी श्रीची बोनी व नैवेद्य असुन यानिमित्ताने अगदी पहाटे पाच वाजता श्रीची पुजाअर्चा व अभिषेक करण्यात येणार आहे.यानंतर भांगेचा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.तर सायंकाळ नंतर शोभेच्या दारूची आतिषबाजीसह मानाचे औट उडविले जाणार आहेत.
सोमवार दिनांक २० एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असून सदर दिवशी श्रीची विधीवत पुजा अर्चा होणार आहे.तर सकाळी ७ वाजता गावातील प्रमुख मार्गावरून श्रीची सुवाद्यासह पालखी मिरवणूक निघणार आहे.सदर पालखी घरोघरी फिरून पुन्हा मंदिर आवारात येणार आहे.याचबरोबर सकाळी १० वाजता अभिनय सम्राट महादेव मानवकर आदर्श लोकनाट्य तमाशा मंडळ मानव यांचा लोकनाट्य तमाश्याचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेदरम्यानेच मंदिर परिसरात शोभेच्या दारूसह मानाचे औट उडविण्यात येणार आहेत. तरी याचा लाभ पाळणेवाले, खेळणीवाले, मिठाईवाले व व्यापारी वर्गांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. अधीक माहितीसाठी ९३७०४८०६९८, ८४५९१७२३२६, ७५८८२५२३३८ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा असे आवाहनही यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.