नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर(विजय चौगुले):- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून माडग्याळ मध्ये १४ फुटी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मूर्तीचा आगमन सोहळा अत्यंत जल्लोषात आणि दिमाखात पार पडला.या मिरवणुकीत आकर्षक म्हणून कराड येथील डिजी छकुली, संघर्ष ग्रुप जवळा, तसेच ढोल ताशांच्या नागरिकांची मने जिंकली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर प्रत्येकांच्या मनामनात पोहोचविण्याच्या संकल्प या मिरवणुकीतून माध्यमातून निर्माण झाला. सामाजिक समता, बुधंंता आणि न्याय या तत्त्वांचा संदेश देणारी ही मिरवणूक अत्यंत प्रेरणादायी ठरली. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, युवकांचा जल्लोष आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती यांमुळे संपूर्ण वातावरण "जय भीम" च्या घोषणाबाजी परिसर दुमदुमून गेले. युगपुरूषाचे विचार हेच आपल्या प्रगतीचे अधिष्ठान आहेत. त्यांच्या समता, न्याय आणि बुधंता विचाराचे प्रेरित होऊन आपण सर्वजण राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देऊया

