चडचणच्या कापड व्यापाऱ्याचे ३ कोटी लुटले
पैशाची पोती घेऊन चौघे दरोडेखोर पसार
टेंभुर्णी परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी परिसरात वाहने अडवून लुटमारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. लुटमारीच्या घटनांमधून गाड्या चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याशिवाय माल, पैसे लुटून आर्थिक नुकसान देखील होत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. त्यामुळे टेंभुर्णी परिसरात दिवस-रात्र पोलीस गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे.त्यानंतर ते पुणे महामार्गावरून सुरतच्या दिशेने निघाले होते.सोमवार दि. ११ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचा टेम्पो टेंभुर्णी येथील करमाळा रोडवरील बंद पडलेल्या बंद टोल नाकाच्या पुढे आला होता. त्यावेळी त्यांच्या टेम्पोला स्वीफ्ट कार आडवी लावण्यात आली. टेम्पोच्या समोर कार अचानक आडवी लावल्याने चालक धुंडाप्पा यांनी टेम्पो उभा केला. त्यावेळी मोटारीतील चौघेजण टेम्पोच्या कॅबिनमध्ये घुसले.धुंडाप्पा यांच्या गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली. दरोडेखोरांपैकी एकाने त्यांचा गळा दाबला तर तिघांनी टेम्पोच्या केबिनवर चढून ताडपत्रीची दोरी कापून पैशाने भरलेली दोन्ही पोती खाली टाकली. पुढच्या काही क्षणात त्यांनी दोन्ही पोती आपल्या शिफ्ट कारमध्ये भरली आणि ते वेगाने टेंभुर्णीच्या विरुद्ध दिशेने पसार झाले होते. लुटमारीचा हा प्रकार घडल्यानंतर टेम्पो चालक धुंडाप्पा खलाटे याने याची माहिती चडचण येथील आपल्या मालकास कळवली. त्यानंतर त्याने टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.पोलिसांनी योग्य तपास करून दरोडेखोरांपैकी अजित नामदेव सुर्वे(वय २६ रा. पांढरेवस्ती मोडनिंब ता. माढा) याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी राहुल आत्राम हे करत आहेत.
