नवचैतन्य टाईम्स वाई (प्रा. संभाजी लावंड):-के. एस. आय. पब्लिकेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित २९ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात वाई येथील कवी व साहित्यिक श्री. विकास तुकाराम घोणे यांना ‘लोकनेते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्य जीवन गौरव पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे वाई तालुक्याच्या साहित्य क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.करवीर वाचन मंदिर, महालक्ष्मी मंदिराजवळ, कोल्हापूर येथे पार पडलेल्या या साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत कवी सरकार तथा श्री. विलास पाटील यांच्या हस्ते श्री. घोणे यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.श्री. घोणे यांच्या साहित्यामध्ये मानवी जीवना तील सुख-दुःख, संघर्ष, नाती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे प्रभावी चित्रण आढळते. ग्रामीण भागातील समस्या, कष्टकरी जीवन, नारीत्वाचा सन्मान आणि समाजप्रबोधन यावर आधारित त्यांच्या लेखनामुळे वाचकां मध्ये विचारांची जागृती निर्माण होत असल्याचे गौरवोद्गार यावेळी मान्य वरांनी काढले. त्यांच्या साहित्यकृतीं मधून मातीचा सुगंध, वास्तववादी जीवनचित्र आणि समाजाला दिशा देणारे विचार प्रभावीपणे मांडले जात असल्याने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या यशाबद्दल साहित्य, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातून श्री.विकास घोणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
