NCT NCT माजी सैनिक भगवान यमगर हे समाजासाठी एक आदर्श - अर्जुन कर्पे

माजी सैनिक भगवान यमगर हे समाजासाठी एक आदर्श - अर्जुन कर्पे

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-अग्रण धुळगांव (ता. कवठेमंहाकाळ) येथे रक्षा विसर्जना ऐवजी वृक्षारोपण करून माजी सैनिक भगवान कृष्णा यमगर यांच्या स्मृतीस अनोखी मानवंदना देण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.                   माजी सैनिक भगवान कृष्णा यमगर (वय ६५) यांचे पुणे येथे निधन झाले. यमगर कुटुंबीयांनी एक अत्यंत सकारात्मक, पर्यावरणपूरक व समाजाला दिशा देणारा निर्णय घेतला. अस्थी विसर्जन न करता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वडाच्या झाडाचे रोपण करण्यात आले. आज रक्षा विसर्जनाच्या वेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगांव येथे रक्षा विसर्जन दिवशी यमगर परिवारातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.स्व. भगवान यमगर यांच्या अस्थी मुलगा संतोष यमगर व जावई सचिन पाटोळे यांच्याहस्ते वडाच्या रोपाच्या पायथ्याशी ठेवून वृक्षारोपण करण्यात आले. 'स्मृतीचे झाड' या संकल्पनेतून हा उपक्रम अत्यंत भावनिक वातावरणात पूर्ण झाला. पाणी फौंडेशनच्या माध्यमातून रक्षा विसर्जनाऐवजी वृक्षारोपण करण्याची संकल्पना रुजविण्याचे मोठे कार्य लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले यांनी केले आहे.त्यांच्या पुढाकारातून गावात स्मृती वन तयार झाले आहे.                          यावेळी सरपंच शिवदास भोसले, अँड. राजू यमगर, संदीप यमगर, इंजि. शिवाजी यमगर, गिरीश शेजाळ, डॉ. रवी शेजाळ, माजी सैनिक मस्कू हजारे, लक्ष्मण चौगुले, पंचायत समिती सदस्य अर्जुन कपें आदीसह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सैनिक भगवान यमगर यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व गावासाठी अभिमानास्पद होते. अशी श्रध्दांजली सरपंच शिवदास भोसले यांनी अर्पण केली. संपूर्ण समाजासाठी एक नवा आदर्श ठरला आहे. अशी भावना पंचायत समिती सदस्य प्रा. अर्जुन कर्पे यांनी व्यक्त