NCT NCT पाचगणी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षाचे कट्टर समर्थक प्रविण गजानन बोधे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

पाचगणी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षाचे कट्टर समर्थक प्रविण गजानन बोधे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद):-पाचगणीच्या राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड घडली असुन पाचगणी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मीबाई  कऱ्हाडकर  यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक प्रवीण गजानन बोधे यांनी कन्हाडकर गटाची २५ वर्षांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जाहीर प्रवेश केला आहे.माजी नगराध्यक्षा सौ. लक्ष्मीबाई कऱ्हाडकर यांच्या नेतृत्वात तब्बल २५ वर्षे एकनिष्ठ राहिलेल्या प्रवीण बोधेंच्या या पावलामुळे कन्हाडकर गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे.शिवसेनेचे व कऱ्हाडकर यांचे ते अनुयायी होते. प्रवीण बोधे हे शिवसेनेचे गिरीस्थानावरील धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते तर त्यांच्या या निर्णयामुळे पाचगणीच्या राजकारणात नवीन कलाटणी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.