नवचैतन्य टाईम्स मुंबई (प्रतिनिधी):-मराठी पत्रकार भवन, मुंबई येथे राष्ट्रीय स्वराज्य सेना या राजकीय पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल यांनी आगामी राजकीय दिशा, संघटन विस्तार आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देशातील सध्याची राजकीय, सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती लक्षात घेता जनतेसमोर सक्षम व पर्यायी नेतृत्व उभे करण्याची गरज असल्याचे पक्षाने नमूद केले. गरीब, शेतकरी, कामगार, कष्टकरी, बहुजन व वंचित समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रीय स्वराज्य सेना अधिक व्यापक जनआंदोलन उभारणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.यावेळी पक्षाने जाहीर केले की, २०२९ ची लोकसभा निवडणूक कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता स्वबळावर लढविण्यात येईल. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व ४८, गुजरातमधील २६ आणि राजस्थानमधील २५ लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे केले जाणार आहेत. बैठकीत शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि अभिजित दीपकने यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रीय स्वराज्य सेनेने पाठिंबा कायम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण व्यवस्था आणि युवकांच्या प्रश्नांवर पक्ष सातत्याने भूमिका घेत राहील, असेही सांगण्यात आले. भारत निवडणूक आयोगाकडे (ECI) नोंदणीकृत असलेल्या राष्ट्रीय स्वराज्य सेनेने यापूर्वी 'बासरी' या अधिकृत निवडणूक चिन्हावर २०२४ च्या लोकसभा, विधानसभा तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या असल्याची माहिती देण्यात आली.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल म्हणाले, "राष्ट्रीय स्वराज्य सेना ही गरीब, शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ आहे. जनतेच्या विश्वासाच्या बळावर आगामी काळात पक्ष अधिक व्यापक संघटन उभारून लोकहिताचे प्रश्न संसद व रस्त्यावर प्रभावीपणे मांडेल."
संपर्क :
ॲड. श्रीहरी बागल
राष्ट्रीय अध्यक्ष / पक्ष प्रमुख
राष्ट्रीय स्वराज्य सेना
(भारत निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष)
निवडणूक चिन्ह : बासरी 🪈
मो.: ९८२०३०५९०९
