नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे) :- कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी, कुंडलापुर, जाखापूर व कुची परिसरात आषाढ महिना सुरू झाल्यापासून आकाडी यात्रांची मोठी रेलचेल सुरू झाली असून,खवय्यांसाठी ती एक मोठी पर्वणीच ठरत आहे. या परीसरातील काही देवदेवतांना मोठ्या प्रमाणात कोंबडा अथवा बोकडाचा बळी दिला जातो.आषाढ महीन्यात तर याचे प्रमाण खूपच आधीक रहाते.त्यामुळे या महीन्यात मांसाहाराची मोठी रेलचेल असते.त्यातच पुढील येणारा महीना हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र असा श्रावण महिना असुन या महिन्यात मांसाहार हे वर्ज्य केले जाते.त्यामुळे याच महिन्यात आधीकचे मांसाहार करुन घेऊया म्हणणाऱ्याची संख्या ही याभागात अधिक असते.आकाडी यात्रेसाठी ईष्ट मित्रमंडळी,पाहुणे,भावकी यांना बोलावून ईतेष्ट जेवणावळीचा बेत आखला जात असतो.त्यामुळे या यात्रेसाठी देशी कोंबडा,बोकड याची खरेदी विक्रीची मोठी धांदल दिसून येत आहे. सध्या देशी कोंबड्यांची किंमत ८००/- ते १०००/- रुपयांच्या घरात तर बोकडांची किमत किमान वजनानुसार म्हणेल त्या भावात सुरू आहे.दहा किलोचा बोकड साधारणतः सात ते आठ हजाराच्या पट्टीत होत आहे.तरीही कोंबडा व बोकड मिळवताना चांगलीच नाकेनऊ होत आहे हे मात्र खरे.
