NCT NCT महाबळेश्वर–तापोला मार्ग दोन दिवसांत तिसऱ्यांदा खचला; नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी

महाबळेश्वर–तापोला मार्ग दोन दिवसांत तिसऱ्यांदा खचला; नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी(नौशाद भाई सय्यद ):-सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर–तापोला मार्गावर अवघ्या दोन दिवसांत तिसऱ्यांदा रस्ता खचल्याची घटना घडली आहे. रस्त्याचा मोठा भाग वाहून गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनचालक व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.    घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या मार्गावरील वारंवार होणाऱ्या भूस्ख लनामुळे नागरिकांनी कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्तीची मागणी केली आहे.                    स्थानिकांच्या मते, पावसाळ्यात हा मार्ग धोकादायक ठरत असून पर्यटक तसेच ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने रस्ता पूर्ववत करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मजबूत संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.