नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी (मकसूद शेख):-दिल्लीतील प्रस्थापित सत्तेविरुद्ध लोकसभा निवडणुकीत 'राष्ट्रीय स्वराज्य सेना' बहुजन समाजातील नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. गेल्या बारा वर्षांत गरिबांच्या उत्थानासाठी कोणताही ठोस कायदा किंवा योजना राबवण्यात सत्ता धाऱ्यांनाअपयश आल्यामुळे,संपूर्ण देशात या सरकार विरुद्ध असंतोषाची लाट आहे. जनतेसमोर एक नवा पर्याय म्हणून 'राष्ट्रीय स्वराज्य सेना' खंबीरपणे उभी राहिली आहे असे मत मुंबईतील मराठी पत्रकार भवन येथे आयोजित बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल यांनी व्यक्त केले. आज मुंबईतील मराठी पत्रकार भवन येथे 'राष्ट्रीय स्वराज्य सेना' या राजकीय पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देशातील आणि राज्यातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीवर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना, राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल यांनी पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपकने यांनी त्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीत केलेल्या उपोषणाला 'राष्ट्रीय स्वराज्य सेना' पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. हा मुद्दा थेट अभ्यासू विद्यार्थ्यांचे करिअर आणि देशातील तरुणांच्या भविष्याशी संबंधित असल्याने, पक्षाने या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता. तसेच आगामी २०२९ ची लोकसभा निवडणूक कोणत्याही युतीशिवाय स्वबळावर लढण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या तीन प्रमुख राज्यांमध्ये सर्व जागेवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा ॲड. श्रीहरी बागल केली आहे. 'राष्ट्रीय स्वराज्य सेना' पक्ष यापूर्वी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, तसेच मुंबई महानगर पालिका आणि वसई- विरार महानगर पालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्या अधिकृत निवडणूक चिन्हावर ,म्हणजे 'बासरी' वर ताकदीने लढला आहे. या सर्व निवड णुकांमध्ये पक्षाला जनतेचा मोठा पाठिंबा आणि मते मिळाली आहेत. राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्ष हा नेहमीच गरीब, शेतकरी, मजूर, कामगार आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी कटिबद्ध आहे. सामान्य जनतेच्या मनात या पक्षाने विश्वास आणि आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे आणि येणाऱ्या काळात पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने लढा देईल, असेहि मत राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. श्रीहरी बागल यांनी व्यक्त केले.
