नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी:-कवठेमहांकाळ पोलीस स्टेशन मध्ये आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या हस्ते क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी पोलीस हवालदार परशराम स्वामी, नारायण गारळे, दीपाली पाटील, स्वप्निल पाटील, राकेश पाटील, सुशांत माळी, पोलीस अंमलदार प्राजक्ता काशीद, महिला पोलीस अंमलदार शेडबाळे, माधुरी माळी व इतर पोलीस कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.
