NCT NCT दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सेवा केंद्र चालू करा -नागरिकांची मागणी

दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सेवा केंद्र चालू करा -नागरिकांची मागणी

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):- कवठेमहांकाळ नगरपंचायतचे कार्यालय पहिल्या मजल्यावर असल्याने दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व गुडघ्याचा त्रास असलेल्या नागरिकांना विशेषतः विविध दाखल्यासाठी अथवा कर भरण्यासाठी पायऱ्या चढताना मोठा त्रास सहन करावा लागतो.पूर्वी उत्पन्नाच्या दृष्टीने ग्रामपंचायत इमारतीची अशी रचना करण्यात आली असली तरी, आज नगरपंचायतीला मिळणारे उत्पन्न लक्षात घेता लोकांच्या सोयीसाठी तळमजल्यावर अथवा मागील बाजूस ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र कार्यालय / सेवा केंद्र आणि किमान एका शिपायाची व्यवस्था करण्यात यावी.                                      तसेच शक्य असल्यास रॅम्प / लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून व्हीलचेअरधारक नागरिकांनाही सहज प्रवेश मिळेल.हा विषय नगरपंचायतीच्या आगामी मासिक सभेत घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती आजी-माजी नगरसेवकांच्या वतीने करण्यात आली आहे.लोकाभिमुख प्रशासन म्हणजे काय? तर ज्या नागरिकांना सर्वात जास्त आधाराची गरज आहे, त्यांच्यासाठी पहिले दार उघडणे. तळमजल्यावर एक छोटीशी खिडकी उघडली तरी ती नगरपंचायतीला जनतेच्या मनात कायमचे स्थान मिळवून देईल. ही मागणी केवळ सोय नाही, तर संवेदनशील प्रशासनाचे लक्षण आहे.