NCT NCT वाई येथील प्राध्यापक संभाजी लावंड यांना ‘राज्यस्तरीय न्यायहक्क समताशाही साहित्यभूषण पुरस्कार २०२७’ जाहीर

वाई येथील प्राध्यापक संभाजी लावंड यांना ‘राज्यस्तरीय न्यायहक्क समताशाही साहित्यभूषण पुरस्कार २०२७’ जाहीर

नवचैतन्य टाईम्स वाई {प्रतिनिधी}:-वाई (सातारा): मराठी साहित्य व सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून मोलाचे योगदान देणारे प्रा. संभाजी रामचंद्र लावंड (उत्कर्षनगर, सिद्धनाथ वाडी, वाई, ता. वाई, जि. सातारा) यांची ‘राज्यस्तरीय न्यायहक्क समताशाही साहित्यभूषण पुरस्कार २०२७’ साठी निवड करण्यात आली आहे.लोकसेवा शिक्षण व क्रीडा बहुउद्देशीय संस्था, मारुतीपेठ, ता. मेहकर, जि. बुलढाणा व दैनिक न्यायहक्क समताशाही आणि साप्ताहिक जानेफळ एक्सप्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो. संस्थेचे मुख्य संपादक अशोक भाऊ शेजूळ आणि पुरस्कार निवड समितीचे अनिल भगवान चव्हाण (ABC) यांनी १३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या निवडपत्राद्वारे ही माहिती दिली.                                 प्राध्यापक लावंड यांनी मराठी साहित्य लेखनासोबतच सामाजिक कार्यात दिलेल्या अहवाल, प्रस्ताव व कार्याची दखल घेऊन, काळजीपूर्वक परीक्षणानंतर त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.दैनिक न्यायहक्क समताशाही व साप्ताहिक जानेफळ एक्सप्रेस यांच्या वर्धापन दिनानिमित्त जानेवारी २०२७ मध्ये मेहकर, जि. बुलढाणा येथे होणाऱ्या वर्धापन दिन व पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.या निवडीबद्दल साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातून प्रा. लावंड यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.