महाबळेश्वर पंचायत समितीच्यावतीने दोन दिवसीय शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी परिपूर्ण असलेल्या सदर शिक्षण महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. शिक्षण महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रसिध्द सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्री.आनंद पळसे साहेब यांनी केले.या प्रसंगी व्यासपीठावर श्री.विजय नायडू, श्री.संभाजी भिलारे, जे के आंब्राळे, अशोक भिलारे ,अशोक राजपुरे, संजय शेलार, चंदर संकपाळ, गणेश धनावडे, राहुल शिंदे, रोहित बगाडे, समीर चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी मृण्मयी देशपांडे यांच्या समोर जिल्हा परिषद केंद्र शाळा भिलार या शाळेचा 'हिरकणी' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.सदर कार्यक्रमातील अक्षरा रांजणे या विद्यार्थिनींच्या अभिनयाचे व संपूर्ण टीमचे मृण्मयी देशपांडे यांनी भरभरून कौतुक केले. व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्तम आयोजन पाहून उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन प्रसंगी बोलताना या महाबळेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्याची इच्छा बोलून दाखवली. अशा महोत्सवाच्या माध्यमातून भविष्यात या तालुक्यातून उत्तम कलाकार घडतील अशी सदिच्छा ही व्यक्त केली. विद्यार्थ्याना अभिनया संदर्भात मार्गदर्शन केले.उत्तम कलाकार घडण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळणे आवश्यक असते. मुलांचे कौतुक होणे गरजेचे असते. व महाबळेश्वर सारख्या दुर्गम तालुक्यात ही संधी या शिक्षण महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळते. यासाठी महाबळेश्वर शिक्षण विभागाच्या या शिक्षण महोत्सवाचे मनापासून कौतुक केले. या विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमात महाबळेश्वर तालुक्यातील मराठी, उर्दू ,इंग्रजी माध्यमांच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, माध्यमिक शाळा, खाजगी शाळा अशा ४५ शाळांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे देशभक्ती, आपली संस्कृती, शेतकरी, शिक्षण, निसर्ग, अशा विविध विषयावर अप्रतिम सादरीकरण केले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन आनंद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे निवेदन पुरुषोत्तम माने,अमित कारंडे, संजय संकपाळ, श्रीनिधी जोशी अजित पाचोरे, रईसा शेख, योगिता पोळ, ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश सरक, तुषार आखाडे, माधुरी भापकर यांनी केले.. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी , नामदेव धनावडे संजय पार्टे,दगडु ढेबे,चंद्रकांत जंगम,विनायक पवार अरुण कदम विष्णू ढेबे, वसीम वारूणकर, अमोल कुंभार, जयराज जाधव, समाधान देशमुख, संतोष चोरगे,विठ्ठल संकपाळ, श्रीगणेश शेंडे, सचिन बोधने, संजय सोंडकर, कुलदीप अहीवळे, अभिजीत खामकर यांनी परिश्रम घेतले..
