नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ ) येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी सैनिक बबन आण्णासो शिंदे (वय -६७) यांचे बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सुना,जावाई व नातवंडे असा परिवार असुन, रक्षाविसर्जन शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता घाटनांद्रे येथील स्मशानभूमीत घेण्यात आले आहे.
