नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सालाबादप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्या पासून सुरू होणाऱ्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणास घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.यावेळी भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवार दिनांक ३० मार्च रोजी सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा,विणा, पताका व व्यासपीठ पुजन करण्यात आले.तदनंतर व्यासपीठ चालक म्हणून हभप विठ्ठल पाटील-महाराज (शेटफळ-करमाळा) यांना सन्मानपूर्वक सुत्रे देण्यात आली व सकाळच्या सत्रातील ज्ञानेश्वरी ग्रंथांचे वाचन करण्यात आले.या सोहाळ्यात महाराष्ट्रतील नामवंत असे किर्तनकार व प्रवचनकार येथे आपली सेवा बजावणार आहेत.त्यानुसार रविवार पासुन पासून पहाटे ४ ते ६ काकड आरती,सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ६.३० ते ७.३० प्रवचन तर रात्री ९ ते ११ किर्तन त्यानंतर जागर होणार आहे.
ठरल्याप्रमाणे रविवार दिनांक ३० मार्च रोजी हभप विठ्ठल पाटील-महाराज (करमाळा) यांचे प्रवचन तर हभप विठ्ठल चौरे-महाराज (पंढरपुर) यांचे किर्तन होणार आहे.सोमवार दिनांक ३१ मार्च रोजी हभप गुलाब शिंदे-महाराज (घाटनांद्रे) यांचे प्रवचन तर हभप नवनाथ रोंगे-महाराज (कोल्हापूर) यांचे किर्तन होणार आहे.मंगळवार दिनांक १ एप्रिल रोजी हभप संजय शेटे (सावळज) प्रवचन तर हभप रामकृष्ण वीर-महाराज (पंढरपूर) यांचे किर्तन होणार आहे.बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी हभप बाळकृष्ण-महाराज (वडगाव) यांचे प्रवचन तर हभप सागर बोराटे-महाराज (नातेपुते) यांचे किर्तन होणार आहे.गुरुवार दिनांक ३ एप्रिल रोजी हभप देवव्रत राणू मालक-वास्कर (पंढरपूर ) यांचे प्रवचन तर हभप आनंद-महाराज (आळंदी) यांचे किर्तन होणार आहे.शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी हभप मोहन पाटील-महाराज (चिंचणी) यांचे प्रवचन तर हभप नामदेव वास्कर-महाराज (पंढरपूर) यांचे किर्तन होणार आहे.
तर शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत हभप विठ्ठल पाटील-महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन,महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमांची सांगता होणार आहे.सदर सोहळ्यास व्यासपीठ चालक म्हणून हभप विठ्ठल पाटील-महाराज शेटफळे (करमाळा) हे काम पहाणार आहेत तर गायक हभप धनंजय मामा (आळंदी) व हभप महारुद्र भोसले (कुंभोज) हे असणार आहेत त्यांना मृदंगाची साथ ही हभप जगदीश पाटील (कोल्हापूर) व हभप विशाल रोंगे (सोलापूर) यांची राहाणार आहे.सोहाळ्याची उत्सुकता सर्वांनाच लागुन राहिली आहे.


