NCT NCT जिवंत सातबारा मोहीमेने खाबुगिरीला चाप बसेल - प्रा दादासाहेब ढेरे

जिवंत सातबारा मोहीमेने खाबुगिरीला चाप बसेल - प्रा दादासाहेब ढेरे


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- मृत खातेदारांच्या वारसांना जमिनीशी संबंधित आधिकार अगदी सहज व तेही गतीने मिळावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल पासून 'जिवंत सातबारा' अद्यावत करण्यासाठी मोहीम राबविण्याचा घेतलेला निर्णय हा अगदी स्वागतार्ह असुन,यामुळे खाबुगिरीला मोठा चाप बसणार असल्याचे मत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा दादासाहेब ढेरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की वारसा नोंदी करताना याआधी मोठी दिरंगाई होत असल्याने बळीराजाला मोठ्या अडचणीला समोर जावे लागत असत.मृत खातेदारांच्या जमिन कित्येक वर्षे राहात असल्याने वारसांना वेळप्रसंगी कोर्टाची पायरीही चढावी लागत.यामुळे बळीराजाचा बराच वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत असे.मोठा त्रासही सहन करावा लागत असे.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागावतीने एक एप्रिल पासून सुरू होणारी 'जिवंत सातबारा' मोहीम आहे.त्यामुळे महसूल विभागाकडून प्रत्येक गावातील नोंदी या अद्ययावत करण्यात येणार असून,तहसीलदार स्तरावर वारसा हक्क निश्चित केला जाणार आहे विशेष म्हणजे यासाठी सक्सेशन सर्टिफिकेटची काही आवश्यकता भासणार नाही.त्यामुळे ही मोहीम पारदर्शक व खाबुगिरीला चाप बसणारी व बळीराजाला दिलासा देणारी ठरेल असेही प्रा दादासाहेब ढेरे यावेळी बोलताना म्हणाले.यावेळी तालुका कॉग्रेसचे कार्याध्यक्ष अविराजे शिंदे (सरकार),सचिव चैतन्य पाटील, अनिल पाटील,प्रकाश कांबळे, बाळासाहेब माने,विनायक जाधव,आप्पासाहेब पाटीलसह कार्यकर्ते उपस्थित होते.