नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सालाबादप्रमाणे याही वर्षी घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे रविवार दिनांक ३० मार्च पासून भव्यदिव्य अश्या पारायण सोहळ्यास प्रारंभ होणार असुन, याचा तमाम भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोहळा समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.
आतापर्यंत दरवर्षीच परंपरेनुसार जेष्ठ नागरिक पारंपरिक पद्धतीने या पारायण सोहळ्याचा पुढाकार घेत असत त्याला इतर सर्वजण सहकार्य करत.परंतु या वर्षी उलट जेष्ठांनी मार्गदर्शनाची भुमिका ठेवून सर्व पारायण सोहळ्याची सुत्रे ही तरुणांच्या हाती सोपवली आहेत.त्यांनीही या सोहळ्याचा संपूर्ण बाजच बदलून टाकला आहे.
यानुसार मुख्य चौक ते विठ्ठल मंदिर दरम्याने भव्यदिव्य असे मंडप टाकण्याचे काम सुरू झाले असुन,गावातील मुख्य मंदिरांनाही आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.तर खानापूर येथील जय साऊंड अँन्ड एलईडी सिस्टीम ही सोहळ्यासाठी असणार आहे तर साहिल मंडप व लाईट यांची आकर्षक विद्युत रोषणाई रहाणार आहे.सोहाळ्यासाठी महाराष्ट्रतील नामवंत असे किर्तनकार व प्रवचनकार येथे आपली सेवा बजावणार आहेत.
त्यानुसार रविवार पासुन पासून पहाटे ४ ते ६ काकड आरती,सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ६.३० ते ७.३० प्रवचन तर रात्री ९ ते ११ किर्तन त्यानंतर जागर होणार आहे.
रविवार दिनांक ३० मार्च रोजी हभप विठ्ठल पाटील-महाराज (करमाळा) यांचे प्रवचन तर हभप विठ्ठल चौरे-महाराज (पंढरपुर) यांचे किर्तन होणार आहे.सोमवार दिनांक ३१ मार्च रोजी हभप गुलाब शिंदे-महाराज (घाटनांद्रे) यांचे प्रवचन तर हभप नवनाथ रोंगे-महाराज (कोल्हापूर) यांचे किर्तन होणार आहे.मंगळवार दिनांक १ एप्रिल रोजी हभप संजय शेटे (सावळज) प्रवचन तर हभप रामकृष्ण वीर-महाराज (पंढरपूर) यांचे किर्तन होणार आहे.बुधवार दिनांक २ एप्रिल रोजी हभप बाळकृष्ण-महाराज (वडगाव) यांचे प्रवचन तर हभप सागर बोराटे-महाराज (नातेपुते) यांचे किर्तन होणार आहे.गुरुवार दिनांक ३ एप्रिल रोजी हभप देवव्रत राणू मालक-वास्कर (पंढरपूर ) यांचे प्रवचन तर हभप आनंद-महाराज (आळंदी) यांचे किर्तन होणार आहे.शुक्रवार दिनांक ५ एप्रिल रोजी हभप मोहन पाटील-महाराज (चिंचणी) यांचे प्रवचन तर हभप नामदेव वास्कर-महाराज (पंढरपूर) यांचे किर्तन होणार आहे.
तर शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत हभप विठ्ठल पाटील-महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन,महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमांची सांगता होणार आहे.सदर सोहळ्यास व्यासपीठ चालक म्हणून हभप विठ्ठल पाटील-महाराज शेटफळे (करमाळा) हे काम पहाणार आहेत तर गायक हभप धनंजय मामा (आळंदी) व हभप महारुद्र भोसले (कुंभोज) हे असणार आहेत त्यांना मृदंगाची साथ ही हभप जगदीश पाटील (कोल्हापूर) व हभप विशाल रोंगे (सोलापूर) यांची राहाणार आहे.सोहाळ्याची उत्सुकता सर्वांनाच लागुन राहिली आहे.
