NCT NCT वैभव कुलकर्णी सहकाऱ्यासह शिवसेनेत दाखल

वैभव कुलकर्णी सहकाऱ्यासह शिवसेनेत दाखल


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष,कवठेमहंकाळ तालुक्यातील एक लढवय्य नेते व रांजणी (ता कवठेमहांकाळ) गावचे सुपुत्र वैभव कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.त्यांच्या या प्रवेशाने शिवसेनेस एक जनसामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारा,लढवय्य व मोठा जनसंपर्क असणारा नेता मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी रात्री उशिरा मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी व त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.यावेळी नामदार एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे बोधचिन्ह असलेला स्कार्फ व भगवा ध्वज देऊन वैभव कुलकर्णी यांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी एकच जल्लोष करण्यात आला.
यावेळी विधान परिषदेच्या उपाध्यक्षा निलमताई गोरे,आमदार सुहास बाबर,जिल्हा प्रमुख आनंदराव पवार,महेंद्र चांडाळसह मान्यवर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.