नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे)- घाटनांद्रे येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील पुरातन पण नव्याने जिर्णोद्धार केलेल्या हनुमान मंदीरात श्री हनुमान जयंती विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.अगदी पहाटे पासूनच मंदिर परिसरात हनुमान जन्मोत्सवाची घाटनांद्रे गावात सकाळ पासुन लगबग दिसून येत होती.भजन,किर्तन,अभिषेक,आरती, पाळणा,पुष्पवृष्टी व महाप्रसाद वाटप यासारखे कार्यक्रम पार पडले.कार्यक्रमाचे आयोजन हनुमान भक्तांनी तर पुजा बांधणीचे काम धोंडीराम गुरव, विजय गुरव,अविनाश गुरव,दादा गुरवसह सहकार्यांनी केले.
घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील हनुमानाची पुरातन मुर्ती.फोटो- जालिंदर शिंदे
