NCT NCT ऋषिकेश पाटील 'हॉर्नेट एरोस्पेस इंडिया' चे सीईओ पदी निवड

ऋषिकेश पाटील 'हॉर्नेट एरोस्पेस इंडिया' चे सीईओ पदी निवड


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- तिसंगी (ता कवठेमहांकाळ) गावचे सुपुत्र ऋषिकेश पांडुरंग पाटील यांची  'हॉर्नेट एरोस्पेस इंडिया' च्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती झाली असुन,आता ते अमेरिकेतील सिग्निया एरोस्पेसचे सीएफओ तसेच सीईओ सोबत काम करतील.त्यांच्या या यशाचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
ही कंपनी ही अगदी स्थापनेपासूनच १ अब्ज डॉलर्स महसूल मिळविण्याच्या प्रभावी ट्रॅक रेकॉर्ड असलेली व एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगातील एक आघाडीची कंपनी आहे.इंडिया साईट लिडर आणि भारतातील कंपनीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक म्हणून ही जबाबदारी ऋषिकेश पाटील यांना भेटली आहे.
आता ते यापुढे त्यांच्या अभियांत्रिकी भूमिके व्यतिरिक्त हॉर्नेट एरोस्पेसच्या भारतातील ऑपरेशनसाठी नफा आणि तोटा (पी ॲड एल) या व्यवस्थापनाचे पर्यवेक्षणही करतील.त्यांना याकामी त्यांचे वरीष्ठ अमेरिकास्थीत डॉंन्टी योग,भाऊ व प्राइम फोकस इंटरप्राईजेसचे पुरुषोत्तम पाटील,आई माजी सरपंच सौ उषा पाटील,वडील माजी उपसरपंच पांडुरंग पाटील यांचे अगदी म्हत्वपुर्ण मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाचे परिसरातून मोठे कौतुक केले जात आहे.
फोटो  ऋषिकेश पाटील