नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे):- उन्हाळी आवकाळी पाऊसच लांबल्याने रखडलेल्या पेरणीपूर्वी मशागतीं सध्या चारपाच दिवसांपासून होत असलेल्या उन्हाळी अवकाळी पावसामुळे आता पेरणीपूर्व मशागतीनी घाटमाथ्यावर चांगलाच वेग घेतला आहे.सततच्या दुष्काळामुळे बैलांची संख्याच रोडावल्याने सध्या सर्रास ट्रॅक्टर द्वारेच मशागती केल्या जात आहेत.
यावर्षी पाऊस वेळे आगोदर व समाधानकारक असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने सध्या बळीराजाच्यात फिलगुडचे वातावरण निर्माण झाले आहे.उन्हाळी पाऊसच लांबल्याने रखडलेल्या पेरणीपूर्वी मशागतींनीही आता अखेरच्या टप्प्यात पाऊस झाल्याने चांगलाच वेग घेतला आहे.त्यामुळे शिवारं गजबजून गेली आहेत.यामध्ये पालापाचोळा वेचणे,बांधबंदिस्त करणे,जमीनीची नांगरट, खुरपणी करणे,रोटर मारणे, नैसर्गिक खतांचा मात्रा देणे इत्यादी कामे उरकून घेतली जात आहेत.खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकर करावे, बी बियाणे व खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावीत अशी मागणीही शेतकरीवर्गातून होत आहे.
कवठेमहंकाळ तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र हे २१३७४ हेक्टर इतके असुन,त्यापैकी पेरणी क्षेत्र हे २०१०६ हेक्टर इतके आहे.गतवर्षी पावसाविना खरिप हंगाम वाया गेला तर रब्बी हंगाम हा अवकाळी पावसामुळे कसाबसा तरला होता.त्यामुळे बळीराजा अद्यापही अडचणी आला आहे.चालूवर्षी तरी खरिप हंगामात निसर्ग साथ देईल व खरिप हंगामातील पिक हाती येईल या आशेवर बळीराजाने शेती मशागतीला चांगलीच सुरवात केली आहे.
बैलजोडीने अनेक शेतकरी आपल्या शेताची मशागत करतात मात्र ज्यांच्याकडे बैलंच नाहीत त्यांना बैलजोडीचा शोध घ्यावा लागत आहे.यापेक्षा टॅक्टर द्वारे मशागतीकडेच कल वाढला आहे.परिसरातील सर्वच विंधन विहिरी व तलावांनी तळ गाठला असून,गेल्या दोन वर्षांपासून खरिप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे.मात्र तरीदेखील यंदा नवीन जोमाने व आशेनं कामाला लागला आहे.
बी बीयाणे,खते खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी बळीराजाची पाऊले आता सोसायटी वा बॅंकेकडे वळू लागली आहेत.सध्या मे महिना मध्यावर आला आहे.जुन महीन्या अगोदरच पाऊसाला सुरुवात होणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करण्यासाठीची बळीराजाची धडपड सुरू झाली आहे
सध्याचे मशागतीची दर पुढीलप्रमाणे
१) नांगरट करणे :- ३००० ते ३५०० रुपये (प्रति एकर).
२) रोटर मारणे :- १६०० ते २००० रुपये (प्रति एकर)
३) पंजा (फण) मारणे :- १२०० ते १५०० रुपये (प्रति एकर)
याप्रमाणे आहेत.
फोटो :- घाटमाथ्यावरील बळीराजा खरिप पेरणीपूर्व मशागतीसाठी यांत्रिकीकरणाचाच आधार घेत आहे.फोटो - जालिंदर शिंदे
