नवचैतन्य टाईम्स वाई (प्रतिनिधी)- पलपब प्रकाशन संस्थेने दिनांक ११मे रोजी राजधानी सातारा येथे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे यथार्थ आयोजन केले.या अंतर्गत कार्यक्रमात श्री अनिल बोधे, सुरेश शिंगटे,आणि श्री प्रदीप कांबळे हे साहित्यिक मान्यवर म्हणून उपस्थित होते.दिप प्रज्वलन , सरस्वतीचे पूजन झाल्यानंतर सर्व श्रोते कवी,लेखक स्थानापन्न झाले.पाहुण्यांचे आगत स्वागत वेळेत आटोपले.समोरील सुशोभित अशा ऱगमंचावरुन उपस्थित रसिक, श्रोते,कवी व लेखक यांना आपलेपणाने उदे्शून सौ.लिनाताईंनी मनोगत व्यक्त केले. पलपब कार्यकारिणीच्या निर्मात्या सौ. लिना ताई पाटील यांनी संवेदनशिल मनाने देश कार्यासाठी युध्दात शहीद झालेल्या शूरवीरांना संमेलनातून आदरांजली वाहिली. अनेकांच्या मनात पलपब या संस्थेविषयी असणारे कुतूहल जागृत केले. समाजात पुस्तके प्रकाशन करणारी संस्था असा मर्यादित अर्थ न घेता, त्या पलीकडे कवी व लेखकांच्या साहित्य कलाकृतींना पाठबळ, आत्मबल व प्रेरणा देऊन आत्मविश्वासाचे,चैतन्याचे व सुविचारांचे पंख लावून साहित्य निर्माण करण्यास प्रवृत्त करणे असा ही आहे, ते निर्माण झालेले साहित्य जागतिक पातळीवरील क्षेत्रात विशेष गतीमान व किर्तीमान करणे हे महान कार्य पलपबचे आहे .अशा प्रकारे अर्थ ध्वनित व विस्ताराने मांडला,त्या पुढे अशाही म्हणाल्या,"साहित्य हे कोणत्याही भाषेतअसू द्या.आम्ही निश्चित आदर करु.पण अखंड लिहून अभिव्यक्त होता आले पाहिजे.आपण लिहिलेले चूक की बरोबर या गुंत्यात अडकू नका.ते काय आहे ,हे काळ ठरविल. कोण काय म्हणेल म्हणून लिहिणे थांबवू नका.बदलत्या काळाचा महिमा कोणीही जाणू शकत नाही मात्र कवी व लेखकांना प्रतीभेच्या सहाय्याने तो समजतो.तो कागदावर आणावा.आपले साहित्य अल्प किमतीत छापून प्रकाशीत करणे, पुरस्कृत करणे,लोकांपर्यंत पोहोचवण्याची खरी जबाबदारी व वृत आम्ही घेतलेले आहे.साहित्यिक आणि पलपब एकत्रितपणे असणे सध्या फार महत्त्वाचे आहे.हे माझ्या पलपब कार्यकारिणीचा प्राण आहे शिवाय त्यांच्या कृतीतून असे ही जाणवत होते की, त्या कुशल संघटक संघटक आहेत. त्यांचे कार्य व कर्तृत्वाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. बोलण्यातून ,संभाषणातून फार मोठा संयम जाणवला.समज आणि गैरसमज हे शब्द त्यांच्या विचारांना रोखू शकत नाहीत.साहित्यिकांच्या मांदियाळीत स्वतःला झोकून देऊन समरसतेने कार्य करणाऱ्या अनेकांचा विचार करणाऱ्या आधारस्तंभ आहेत.
प्रा.संभाजी लावंड
ग्रामीण लेखक
उत्कर्षनगर वाई
