नवचैतन्य टाईम्स वाई (प्रा. संभाजी लावंड)-अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे त्रि शताब्दी जयंती निमित्ताने कराडला विविध क्षेत्रातील महिलांना आदर्श माता तसेच अहिल्यारत्न पुरस्काराने १४६ कर्तृत्ववान महिलांना यथोचित सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रात हा सर्वात मोठा पुरस्कार वितरण सोहळा कराड येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात अत्यंत उत्साहाने पार पडला.सुवर्णा पाटुकले यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल अहिल्या रत्न हा पुरस्कार देण्यात आला. त्यांचे एकूण सात काव्यसंग्रह प्रकाशित असून श्री.दासबोधावर सारकाव्य लेखन सुरू आहे त्यांनी एकता व होणार सून मी त्या घरची या दोन मराठी चित्रपटांसाठी गीत लेखन केले आहे तसेच विविध साहित्य समूहातून सहप्रशासक ग्राफिक्सकार म्हणून याकार्यरत आहेत.भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच सातारा या संस्थेच्या सातारा जिल्ह्याच्या शाखेच्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत. विविध क्षेत्रातून तसेच साहित्य साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमास मा. आमदार रामहरी रुपनवर विशेष अतिथी होते. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या तेजस्वी जीवनाचा मागोवा घेतला.कर्मवीर बाळासाहेब कर्णवर पाटीलचेअरमन सद्गुरु श्री साखर कारखाना बळवंत पाटील राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शिक्षक संघ, प्रवीण काकडे अध्यक्ष अहिल्यादेवी ट्रस्ट बाळासाहेब खरात उद्योगपती उत्तमराव गलांडे सदस्य स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, श्रीमंत योगीराज संजय गायकवाड अशोकराव शेडगे माजी नगरसेवक सातारा हनुमंतराव दुधाळ उद्योगपती पुणे आरटीओ इन्स्पेक्टर सौरभ दडस आबासाहेब गावडे माजी नगराध्यक्ष मलकापूर विजय वाटेगावकर माजी नगरसेवक कराड शंकरराव वीरकर म्हाडा अधिकारी मुंबई संभाजी काकडे उपसभापती मार्केट समिती कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले. आभार एम डी दडस यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. दिलीप बरकडे प्रा. शितल काकडे सतीश थोरात आणि अनेक सहकारी उपस्थित होते.
