NCT NCT घाटनांद्रेत पडीक विहिरीत आढळला मृतदेह

घाटनांद्रेत पडीक विहिरीत आढळला मृतदेह

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :-घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील गावतच पण दिघंची -हेरवाड राज्यमार्गालगत असणाऱ्या पडीक विहिरीत बाळू पंढरीनाथ तुपे (वय-५३) सध्या रहाणार घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) (मुळ गाव आंबवडे तालुका खटाव जिल्हा सातारा) यांचा मृतदेह आढळून आला.ते काही दिवसांपासून बेपत्ता होते.तशी फिर्याद पोलिस पाटील महादेव उर्फ एकनाथ शिंदे यांनी कवठेमहंकाळ पोलिसात दिली आहे.तोल जाऊन विहिरीत पडले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.तसा गुन्हा कवठेमहंकाळ पोलीसात नोंद असुन पुढील तपास पोलीस  करीत आहेत.