NCT NCT श्री. महालक्ष्मी पतसंस्थेच्या शिरढोण शाखेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

श्री. महालक्ष्मी पतसंस्थेच्या शिरढोण शाखेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

 

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या शिरढोण शाखेचा वर्धापन दिन नुकताच अती उत्साहात संपन्न झाला.संस्थापक व चेअरमन श्री विलासराव (आबा) कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली यशस्वीपणे वाटचाल चालू असलेल्या श्री. महालक्ष्मी पतसंस्थेच्या शिरढोण शाखेचा २६ वा वर्धापन दिन प.पु. आनंदगिरी महाराज गुंडीबुवा मठ देशिंग यांच्या शुभहस्ते साजरा झाला. शिरढोण शाखेच्या ठेवी रु.८ कोटी व कर्ज वाटप रु.६ कोटी इतके असून शाखेला मार्च अखेर रु.८ लाख नफा झाला आहे. शाखेची कर्ज वसुली चांगली असून शाखेने तारणी कर्जवाटप केलेले आहे. शाखेचा एकूण व्यवसाय १४ कोटी इतका आहे. संस्थेकडे ठेव व कर्ज व्यवहारामध्ये वाढच होत आहे. वर्धापन दिनी ठेवीदार व कर्जदार यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. शाखेच्या प्रगतीसाठी आपण सर्व सभासद बंधुंनी भरीव असे सहकार्य केलेले असून या पुढील काळात आपण भरीव असे सहकार्य कराल असे संस्थापक व चेअरमन श्री विलासराव (आबा) कोळेकर यांनी आवाहन केले. यावेळी संस्थेचे संचालक श्री. आलगोंडा पाटील, श्री. पांडुरंग जाधव, श्री. बंडु कोळेकर, श्री. जालिंदर काशीद, श्री. बळवंत धर्मे, श्री. श्रीकांत चंदनशिवे, श्री. मधुकर पाटील, मॅनेजर श्री.हरी वावरे शाखाधिकारी श्री. दत्तात्रय पाटील, विनोद पाटील, अनिल पांढरे, सुनिल माने, सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत शिरढोण, माणिक पाटील, शिवाजी कदम, संजय पाटील, यशवंत सूर्यवंशी, हणमंत जाधव, गोपाळ पाटील, उत्तम पाटील, विलास काळे, बंडु साळुंखे, वसंतराव पाटील, हणमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शाखाधिकारी श्री. सिद्राम पाटील यांनी आभार मानले.