नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर (विजय चौगुले):-महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 1 ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान राज्यभर साजरा होणारा महसूल सप्ताह जत तालुक्यात विशेष उत्साहात व प्रभावी पद्धतीने राबविण्यात येणार आहे, अशी माहिती संखचे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी दिली. याबाबत अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास म्हणाले, प्रत्येक घटकांपर्यंत महसूल प्रशासन पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असून हा सप्ताह नागरिकांसाठी अनेक योजनांचे प्रत्यक्ष लाभ घेण्याची संधी ठरणार आहे. या सप्ताहात 2011 पूर्वीपासून शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना अतिक्रमण पट्टे वाटप, डीबीटी लाभ थेट खात्यावर वर्ग करणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासन , शिवाय रस्त्यांची मोजणी व वृक्षारोपण , छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, आणि एम सँड धोरणाची अंमलबजावणी यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
जत तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी यांना योग्य नियोजनाने नागरिकांशी थेट संपर्क साधण्याचे निर्देश दिले असून, महसूल प्रशासन तुमच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे , नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा.
रोहिणी शंकरदास, संख अप्पर तहसीलदार
