NCT NCT 31 डिसेंबर पूर्वी मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी, महिलांचा दारूच्या दुकानांवर हल्ला

31 डिसेंबर पूर्वी मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी, महिलांचा दारूच्या दुकानांवर हल्ला

नवचैतन्य टाईम्स (प्रतिनिधी):-आग्रामध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी दारूच्या दुकानांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण या हल्ल्यामुळे परुष दारू प्यायचं बंद करतील का? अशी नवी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. तुम्हाला काय वाटतं?                                 ३१ डिसेंबरची तळिरामांनी जोरदार तयारी सुरू केली असेल. वर्षाच्या शेवटी दारूच्या दुकानांसमोर रांगा लागतात, त्यामुळे काही जण १५ दिवस आधीच घरात दारूचा स्टॉक जमा करून ठेवतात. पण ही ३१ ची पार्टी सुरू होण्यापूर्वीच तळिरामांना मोठा फटका बसला आहे. महिलांनी दारूची दुकानं फोडण्याची मोहीम हाती घेतली आहे.होय, आग्रा येथील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या ठिकाणी महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी आंदोलन करत रस्त्यावरील दारूची दुकानं फोडली. या महिलांचा दुर्गा अवतार पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.                                                पुढील लिंक ओपन करुन व्हिडीओ पहा...          https://x.com/Abhimanyu1305/status/2001217126602846561?s=20                                      दारू शरीरासाठी किती घातक आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. तरीही जगभरातील लोक दारूच्या व्यसनाच्या आहारी जातात. काही जण इतके व्यसनी होतात की त्यांना घर उद्ध्वस्त होत असल्याचीही जाणीव राहत नाही. घरात बायकांवर हात उचलतात, मुलांना शिवीगाळ करतात. दारू त्यांच्या आयुष्याचा पूर्णपणे नाश करते, याचे भान त्यांना राहत नाही.अशा वैतागलेल्या तळिरामांच्या बायकांनी अखेर हातात काठ्या घेतल्या आणि थेट दारूच्या दुकानांवर हल्ला केला. दुकानातील एकेक बाटली फोडून टाकली.