NCT NCT महाबळेश्वर–पाचगणी एसटी बससेवेअभावी सर्वसामान्य जनता बेहाल; सोशल मीडियावर संताप व्यक्त

महाबळेश्वर–पाचगणी एसटी बससेवेअभावी सर्वसामान्य जनता बेहाल; सोशल मीडियावर संताप व्यक्त

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद सय्यद):-महाबळेश्वर–पाचगणी या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांसाठी पुरेशी व थेट एसटी बससेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून याबाबतचा संताप आता थेट सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप व इतर सोशल मीडिया माध्यमांवर नागरिकांनी आपल्या व्यथा मांडत एसटी महामंडळाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली आहे.कोल्हापूर, कराड, सातारा आदी प्रमुख शहरांतून महाबळेश्वर–पाचगणीपर्यंत थेट व नियमित बससेवा नसल्याने प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा, गर्दी आणि वारंवार बस बदलण्याची वेळ येत आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना बसत असून सर्वसामान्य जनतेची अवस्था अक्षरशः बेहाल झाली आहे. महाबळेश्वर–पाचगणी हे पर्यटन, शिक्षण व व्यवसायाचे केंद्र असतानाही वाहतूक सुविधांचा अभाव ही गंभीर बाब असल्याचे नागरिक सोशल मीडियावर ठामपणे मांडत आहेत. “जगप्रसिद्ध ठिकाण फक्त जाहिरातीतच का?” असा थेट सवालही नेटिझन्सकडून उपस्थित केला जात आहे.                                                                      वारंवार तक्रारी करूनही एसटी महामंडळ व प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने नाराजी अधिकच वाढली असून, तात्काळ थेट, नियमित व वाढीव बससेवा सुरू करण्याची जोरदार मागणी सोशल मीडियावरून करण्यात येत आहे.दरम्यान, नागरिकांच्या या संतप्त प्रतिक्रियांमुळे एसटी महामंडळ याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.                                          नागरिकांना तासन तास एका ठिकाणी वर दुसऱ्या ठिकाणी थांबत थांबत प्रवास धरावा लागतो त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक लहान मुले गरोदर महिला अपंग परिस्थितीत असणारे सर्वसामान्य त्याचा भरपूर त्रास भोगाव लागत   महाबळेश्वर वरून कोल्हापूर कडे जाणारी कोल्हापूर कडून महाबळेश्वर येणाऱ्या गाड्यांमध्ये वाढ करा उद्या असणाऱ्या गाड्या दे वेळेवर येत नसल्याचे अनेक नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे त्या देखील वेळेवर पोहोचत नाही एसटी महामंडळापासून एकच कारण उरते रस्त्यामध्ये काम चालू आहे प्रॉफिट जाम असल्यामुळे गाड्या वेळेवर पोहोचत नाही एवढे बोलू एवढे बोलू आपल्या जबाबदारी पुढे मांडत नाहीत ?