NCT NCT घाटनांद्रेत ढालगावच्या स्वाती झुरे ठरल्या इलेक्ट्रीकल बाईकच्या मानकरी

घाटनांद्रेत ढालगावच्या स्वाती झुरे ठरल्या इलेक्ट्रीकल बाईकच्या मानकरी

 

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे :- माननीय विकास (भाऊ) हाक्के फाऊंडेशन दुधेभावी यांच्या वतीने घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथे घेण्यात आलेल्या सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यु होम मिनिस्टर 'खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा' या झालेल्या भरगच्च कार्यक्रमात अगदी अटीतटीच्या खेळात अंतिम फेरीत ढालगाव (ता कवठेमहांकळ) येथील सौ स्वाती अतुल झुरे यांनी बाजी मारून त्या इलेक्ट्रीकल बाईकच्या मानकरी ठरल्या यावेळी त्यांच्या समर्थकांसह उपस्थित महिलांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे कौतुक केले.                                                                                 गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून रंगलेल्या या खेळातढालगाव,नागज,रायवाडी,घाटनांद्रे,तिसंगी,गर्जेवाडी,कुंडलापुर व जाखापुर येथील महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवून एकच जल्लोष केला होता.सदर स्पर्धेमध्ये उखाणे स्पर्धा,डान्स स्पर्धा, विविध प्रकारच्या प्राण्यांचे आवाज काढणे,फुगे फुगवणे, प्रेक्षकातील लहान मुलांची झटकन पॅन्ट काढून आणणे यासारख्या विविध प्रकारच्या खेळाचा समावेश होता.                          सदर खेळाचे सादरकर्ते व निवेदक सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगांवकर व त्यांची कन्या बालगायीका टिव्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर यांनी आपल्या बहारदार वाणीने कार्यक्रमास चांगलीच रंगत आणली होती.यावेळी स्पर्धक महीलासह प्रेक्षक महीलांनीही डांन्ससह मनमुराद आनंद लुटला.                                  सदर स्पर्धेत स्वाती अतुल झुरे (ढालगाव ) या प्रथम क्रमांक मिळवून इलेक्ट्रीकल बाईकच्या मानकरी ठरल्या.तर अनुष्का गौतम बनसोडे-कांबळे (घाटनांद्रे ) या द्वितीय क्रमांक मिळवून त्यांनी वॉशिंग मशीन पटकावले,मेघा प्रकाश रास्ते (घाटनांद्रे ) या तृतीय क्रमांकाने फ्रिजच्या मानकरी ठरल्या तर कोमल सागर शिंदे (घाटनांद्रे ) या चौथ्या क्रमांकाने त्यांनी गिझर पटकाविला व सोनाली अजित रास्ते (घाटनांद्रे ) या पाचव्या क्रमांकावर येऊन ओव्हन च्या मानकरी ठरल्या या सर्व विजेत्यां उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.                                                 कार्यक्रमाच्या सुरुवातीला घाटनांद्रेचे सरपंच अमर शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर जेष्ठ नेते व गर्जेवाडीचे माजी सरपंच प्रल्हाद (बापू) हाक्के यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे विधीवत उदघाटन करण्यात आले.                                                   यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश (भाऊ) पाटील,माजी सभापती व सदर फाऊंडेशनचे सर्वस्वा विकास हाक्के, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती राधाबाई हाक्के, ढालगावचे सरपंच सुरेशभाऊ घागरे,दुधेभावीचे सरपंच प्रकाश हाक्के,मजुर फेडरेशनचे माणिकराव जाधव,सौ पुजा (वहीनी) हाक्के, जेष्ठ नेते प्रल्हाद (बापू) हाक्के,तिसंगीचे माजी सरपंच वामन कदम,कुंडलापुर सोसायटीचे चेअरमन दिपक चव्हाण,वाघोली चे युवा नेते दिपक (दादा) शिंदेसह महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.स्वागत प्रास्ताविक संजय पाटील (ढालगाव) यांनी केले.                                      कार्यक्रमास उपस्थितीत अगदी सर्वच महिलांना फाउंडेशनच्या वतीने साडी भेट देण्यात आल्याने त्यांचाही आनंद द्विगुणित झाला होता.तर आकर्षक विद्युत रोषणाईने व इकोसाऊन्ड सिस्टीमने कार्यक्रमास एकच रंगत आणली होती