NCT NCT पाचगणीत कला आणि राजकारणाचा ऐतिहासिक संगम

पाचगणीत कला आणि राजकारणाचा ऐतिहासिक संगम

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद सय्यद):-पाचगणी : थंड हवेच्या निसर्गरम्य पाचगणी नगरीत आज एक महत्त्वाची आणि चर्चेत राहणारी घडामोड घडली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी बॉलिवूडचे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान यांच्या पाचगणी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या अनपेक्षित पण अर्थपूर्ण भेटीमुळे संपूर्ण राजकीय आणि कलाविश्वाचे लक्ष पाचगणीकडे वेधले गेले आहे.                          आमिर खान यांचे पाचगणीशी असलेले नाते जुने आणि अतिशय जिव्हाळ्याचे आहे. शांतता, निसर्ग आणि सर्जनशीलतेसाठी ते पाचगणीला आपले दुसरे घर मानतात. याच पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत कला, समाजकारण, सामाजिक जबाबदारी, तसेच देशातील सध्याच्या महत्त्वाच्या विषयांवर दोघांमध्ये सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली.                                    राजकारणातील जबाबदार नेतृत्व आणि चित्रपटसृष्टीतील संवेदनशील कलाकार एका छता खाली आल्याने ही भेट केवळ औपचारिक न राहता पाचगणीच्या सामाजिक- सांस्कृतिक ओळखीला नवा आयाम देणारी ठरली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.