NCT NCT सहजयोगी प्रा.श्री.संभाजी लावंड यांच्या सहज संवाद या पुस्तकाचा सातारा येथे होणार प्रकाशन सोहळा

सहजयोगी प्रा.श्री.संभाजी लावंड यांच्या सहज संवाद या पुस्तकाचा सातारा येथे होणार प्रकाशन सोहळा

नवचैतन्य टाईम्स वाई (प्रतिनिधी):-प्रा.श्री संभाजी लावंड वाई.यांनी प.पू.श्री निर्मलादेवी माताजींच्या  सहजयोगाचा सुक्ष्म अभ्यास करुन लिहिलेल्या सहज संवाद या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सोहळा रविवार दिनांक १ मार्च२०२६ रोजी सकाळी ११वाजता सातारा येथील मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते होणार आहे.कवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळीचे विलास पाटील यांनी कळविले आहे. २७फेब्रुवारी २०२६ मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून २७ वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन रयत शिक्षण संस्था छत्रपती शिवाजी काॅलेज, बॅ.पी.जी पाटील हाॅल नं.१४, सातारा या ठिकाणी आयोजित केला आहे.या वेळी डॉ.शिवाजी शिंदे (सहायक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर) सुमन गजानन देसाई (उपसंघटक ,उबाठा शिवसेना मिरा भाईंदर मुंबई), सुंदर दास फंड(ज्येष्ठ साहित्यिक), दिपक पवार (प्रसिद्ध कवी) आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कवी सरकार इंगळी यांनी केले.सदर पुस्तकात ४१ सहज चैतन्यमय ललित लेख असून वाचकांना व सहजयोगी साधकांना चैतन्याची अनुभूती देणारे आहेत. सदर पुस्तकात १२७ पाने असून पुस्तकाची किंमत २२० रु. आहे. त्यांच्या ग्रामीण गुराखी व वलाफोक या कथासंग्रहांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले असून, त्यांनी कथा, कविता, कादंबरी,नाटक, प्रवास वर्णने, चरित्र,गझल, आदि साहित्य लेखन केले आहे. आज नवोदित लेखकांमध्ये नाव लौकिक वाढत आहे.मराठी साहित्यामध्ये त्यांचे नाव भविष्यात ग्रामीण साहित्यिक म्हणून आदराने घेतले जाईल. असे कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे कळवले आहे .