NCT NCT नुतून मध्ये'हृदय फुफ्फुस पुर्नजीवन प्रक्रिया' विषयावर कार्यशाळा संपन्न

नुतून मध्ये'हृदय फुफ्फुस पुर्नजीवन प्रक्रिया' विषयावर कार्यशाळा संपन्न

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे- माळी):-राष्ट्रीय न्याय आरोग्य संशोधन संस्थेच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील नूतन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये हृदय फुफ्फुस पुनजीवन प्रक्रिया' या विषयावर कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.             मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे विद्यार्थी व कर्मचारी वर्गासाठी उझठ (Cardiopulmonary Resuscitation) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ व प्रभावी जीवनरक्षक उपचार कसे करावेत? याचे सखोल प्रात्यक्षिक व प्रत्यक्ष प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आले. नरसिंहगाव येथील नूतन होमिओपथिक मेडिकल कॉलेजमध्ये सीपीआर वरील कार्यशाळेत डॉ. वेदव्यास मोरे यांनी मार्गदर्शन केले.                                                      याला मराठीत हदय-फुफ्फुस पुनर्जीवन प्रक्रिया असे म्हणतात. हृदयाचे ठोके थांबले असतील किया श्वासोच्ट्रास बंद झाला असेल, तर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी जी तात्काळ दिलों जाणारी आपत्कालीन उपचार पध्दआहे, तिला CPR म्हणतात. हृदयविकाराचा झटका, बुडणे,विजेचा पक्का, अपघात झाल्यास श्वास बंद पडल्यास किया व्यक्ती बेशुध्द असल्यास छातीवर दाब देठान हृदयातून रक्ताश्वाह सुरू ठेवण्यासाठी कृत्रिम श्वसन दिले जाते. वेळेस CPR दिल्यास रुग्णांचे प्राण वाचण्याची शक्यता वागते. मेदचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. ही कार्यशाळा इतरत्र संस्थेतील अनुभवी डॉक्टर व तज्जांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यामध्ये डॉ. वेदव्यास मॉर (HOD Good Samantan), डॉ. कौस्तुभ घाटुळे (HOD समृद्धी महामार्ग १०८ प्रकल्प), विशाल शिंदे (सांगली), अजित सूर्यवंशी सांगली) व संतोष गायकवाड सांगली) यांनी मार्गदर्शन केले.     संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नूतन माळी व सचिव डॉ. रामलिंग माळी यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. अमोल पाटील व प्राचार्य डॉ. जयप्रकाश कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. सीमा देशपांडे, डॉ. स्वानंद पाटील, ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. विजयकुमार शिंदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्याची उपस्थित होते.