NCT NCT मळणगाव गणात राष्ट्रवादीचा दमदार उमेदवार - दिलीप शिवाजी जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

मळणगाव गणात राष्ट्रवादीचा दमदार उमेदवार - दिलीप शिवाजी जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी (अनंत कुलकर्णी ):-मळणगाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे श्री. दिलीप शिवाजी जाधव यांनी आज अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 साठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला चांगलाच वेग आला.    पत्रकारी पेशातून लोकप्रतिनिधी होण्याचा प्रवास जाधव यांच्या व्यक्तिमत्त्वात अनोखी धार निर्माण करतो. पत्रकारितेमुळे शासन-प्रशासनाच्या पद्धती, लोकांच्या अपेक्षा, तसेच बदललेल्या राजकीय वातावरणाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला आहे. एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नव्हे तर समस्येच्या समाधानासाठी लढा देणारा व्यक्ती म्हणून अनेक सामाजिक संस्था व नागरिकांनी त्यांच्याकडे अपेक्षेने पाहिले आहे—यामुळेच त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर वेगळे वजन प्राप्त झाले आहे.                    गणातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील कामांबाबत राजकीय समतोल राखत प्रशासनाशी सलोखा ठेवून प्रश्न सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न पूर्वीपासून जाणवतो. कार्यकर्त्यांपासून ते स्थानिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत त्यांची सहज भेट आणि साधेपणाने संवाद साधण्याची पद्धत ही राजकारणात दुर्मिळ होत चाललेली गोष्ट स्थानिकांनी नोंदवली आहे.                                                                    यामुळेच आजचा अर्ज दाखल होताना उपस्थित नागरिकांमध्ये ‘एक कार्यकर्तृत्ववान, जमिनीवरून लढणारा आणि जनतेत मिसळणारा उमेदवार मिळाला’ अशी भावना प्रकर्षाने जाणवत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘गणातील ही निवडणूक केवळ राजकीय नसून विकासाच्या अध्यायाची सुरुवात ठरेल’ असा विश्वास व्यक्त केला.आगामी ५ फेब्रुवारी रोजी या गणातील मतदार नक्कीच दिलीप जाधव यांना भरभरून मतदान करतील व लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी देतील.