NCT NCT 'आंतरराष्ट्रीय टॅटू स्पर्धेत भारतीय 'डाॅट लाईन टॅटूचे आर्टिस्ट' वाशिवली गावचे सुपुत्र मा. सुनिल विष्णू वाशिवले यांचे काठमांडू, नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर दणदणीत विजय

'आंतरराष्ट्रीय टॅटू स्पर्धेत भारतीय 'डाॅट लाईन टॅटूचे आर्टिस्ट' वाशिवली गावचे सुपुत्र मा. सुनिल विष्णू वाशिवले यांचे काठमांडू, नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर दणदणीत विजय

नवचैतन्य टाईम्स वाई(प्रा. सौ.सरस्वती वाशिवले):-नवी मुंबईतील Dot Line Tattoo Studio ने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं यश संपादन केलं आहे. नेपाळमधील Kathmandu येथे 10, 11 आणि 12 तारखेला आयोजित टॅटू कन्व्हेन्शनमध्ये स्टुडिओचे आर्टिस्ट Sunil Washivale यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, या काठमांडू कन्व्हेन्शनमध्ये फक्त नामांकित (Invited) आर्टिस्ट् सहभागी होण्याची संधी दिली जाते, ज्यामुळे या स्पर्धेचे महत्त्व अधिक वाढते. या स्पर्धेत एकूण 150 आर्टिस्ट्स सहभागी होते, त्यामधून Realistic Healed (Full Sleeve) कॅटेगरीमध्ये 1st Prize मिळवत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच, भारतामधून पहिल्यांदाच Dot Line Tattoo Studio ला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.डॉट लाईन टॅटू स्टुडिओने आजपर्यंत 30+ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले असून, गुणवत्ता आणि क्रिएटिव्हिटीसाठी ते एक विश्वासार्ह नाव बनले आहे.हा विजय स्टुडिओच्या मेहनत, कौशल्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामाचा पुरावा असल्याची माहिती सुनील वाशिवले यांनी सांगितले.