NCT NCT गर्जेवाडीत श्री ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ

गर्जेवाडीत श्री ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):सालाबादप्रमाणे याही वर्षी गर्जेवाडी (ता कवठेमहांकाळ) येथे भव्यदिव्य श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला असून यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तरी याचा लाभ पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.  शनिवार दिनांक २५ एप्रिल ते शुक्रवार दिनांक १ मे दरम्यान चालणाऱ्या या पारायण सोहळ्यात दररोज पहाटे ५ ते ६ काकडा,सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन,६ ते ७ हरीपाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन व ११ ते पहाटे ५ जागर असे कार्यक्रम होणार.त्यानुसार  शनिवारी सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा,विणा व ज्ञानेश्वरीचे पुजन करुन सदर पारायण सोहळ्याचे विधीवत प्रारंभ करण्यात आले.                        शनिवार दिनांक २५ रोजी हभप अर्जुन शिंगाडे (गर्जेवाडी) यांचे प्रवचन तर हभप राहुलजी फडतरे (दिघंची) यांचे किर्तन त्याचबरोबर गर्जेवाडी भजनी मंडळाचा जागर होणार आहे.रविवार दिनांक २६ रोजी हभप बाळकृष्ण (वडगाव) यांचे प्रवचन तर हभप मोहन काक (घोटीकर) यांचे किर्तन त्याचबरोबर वाघोली भजनी मंडळाचा जागर होणार आहे.सोमवार दिनांक २७ रोजी हभप गुलाब शिंदे (घाटनांद्रे) यांचे प्रवचन तर हभप सुभाष पाटील (विसापूर) किर्तन त्याचबरोबर कुंडलापुर भजनी मंडळाचा जागर होणार आहे.मंगळवार दिनांक २८ रोजी हभप आदीनाथ पवार (कुची) प्रवचन तर हभप धनाजी ओलेकर (आळंदी) यांचे किर्तन त्याचबरोबर घाटनांद्रे भजनी मंडळाचा जागर होणार आहे.बुधवार दिनांक २९ रोजी हभप संपतराव जाधव (तिसंगी) यांचे प्रवचन तर हभप अनिल डुबुले (तडवळे) कीर्तन त्याचबरोबर डोंगरसोनी भजनी मंडळाचा जागर होणार आहे.     गुरुवार दिनांक ३० रोजी हभप शिवाजी साळुंखे (वाळेखिंडी) यांचे प्रवचन तर हभप हेमंत मराठे (चोरोची) यांचे किर्तन त्याचबरोबर सायंकाळी ५ ते ७ नरसिंह जयंती निमित्त हभप शिवाजी साळुंखे (वाळेखिंडी) यांचे किर्तन होणार आहे.तर शुक्रवार दिनांक १ मे रोजी सकाळी ८ ते १० गावातील प्रमुख मार्गावरून पालखी व दिंडी सोहळा मिरवणूक होऊन पुढे १० ते १ हभप तुकाराम हजारे (शिरुर) यांचे काल्याचे किर्तन महाप्रसादाच्या वाटपाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.सदर सोहळ्यास व्यासपीठ चालक म्हणून हभप अर्जुन शिंगाडे (गर्जेवाडी ) हे काम पहाणार आहेत तर मृदंगाची साथ ही हभप श्रीधर माने व हभप अरविंद सुतार (गर्जेवाडी) यांची रहाणार असुन शेलेकरी हभप रोहित मोरे (नाशिक) व हभप सोमनाथ ऐवळे हे असणार आहेत.त्याचबरोबर हरिपाठ साथ ही विठू माउली वारकरी शिक्षण संस्था दिघंची हे बजावणार आहेत.