NCT NCT मित्राची भेट ठरली अखेरची आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट दरीत कोसळून ८ मित्रांची अपघाती मृत्यू

मित्राची भेट ठरली अखेरची आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट दरीत कोसळून ८ मित्रांची अपघाती मृत्यू

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी(नौशाद भाई सय्यद):-आंबेनळी घाटात सुरू असलेल्या अपूर्ण रस्त्याच्या कामाबाबत रात्रीच्या वेळी वाहन चालविण्यास धोक्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.पाचगणी इंडियन टाइम्स 24/7 महाराष्ट्र आणि नवचैतन्य टाईम्स यांनी रात्री ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान घाटातील धोकादायक परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास घाटात भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.                                           मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ सुमारे ८०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत 8 मित्राची मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अधिकृत प्रशासनाकडून अद्याप अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.      स्थानिक नागरिकांच्या मते, घाटातील अपूर्ण रस्ते काम, अरुंद मार्ग, खोल गेलेले साईड पट्टे, रिफ्लेक्टर व सुरक्षा भिंतींचा अभाव आणि रात्री समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र लाईटमुळे चालकांना मोठा धोका निर्माण झाला होता. याच कारणांमुळे हा मोठा अपघात घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.               अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.        “आंबेनळी घाट मोठ्या अपघाताला आमंत्रण देत आहे,” असा इशारा नागरिकांकडून वारंवार दिला जात होता. आता या दुर्घटनेनंतर संबंधित विभाग, ठेकेदार आणि प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.घटनेबाबत अधिकृत माहिती येणे बाकी असून प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.