NCT NCT महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची पाचगणी येथे धावती भेट

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची पाचगणी येथे धावती भेट

नवचैतन्य टाईम्स पाचगणी(नौशाद भाई सय्यद):-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष Harshvardhan Sapkal श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी पाचगणी शहराला धावती भेट दिली. त्यांच्या आगमनानंतर शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी पाचगणी नगराध्यक्ष Dilip Bagade श्री. दिलीप बगाडे तसेच महाबळेश्वर तालुका काँग्रेस अध्यक्ष Rajendra Bhandari श्री. राजेंद्र भंडारी यांनी श्री. हर्षवर्धन सपकाळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शहरातील अनेक पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.                                                पाचगणी शहरात झालेल्या या धावत्या भेटीदरम्यान मान्यवरांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक घडामोडी, जनतेचे प्रश्न तसेच सामाजिक विषयांवर चर्चा केली. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून शहरात या भेटीची चर्चा सुरू आहे.                    या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी “काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाचगणी शहरात आल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला असून ही भेट आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली,” अशी भावना व्यक्त केली.श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाचगणी दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.