NCT NCT पाचगणीत अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाचा हातोडा तहसीलदार सचिन मरके यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई

पाचगणीत अनधिकृत बांधकामावर महसूल विभागाचा हातोडा तहसीलदार सचिन मरके यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी(नौशाद भाई सय्यद):-महाबळेश्वर- पाचगणी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात महसूल विभागाने कठोर पाऊल उचलत आज सिडनी पॉईंट परिसरातील एका आलिशान बंगल्यावर कारवाई केली.माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा नुसार महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मरके यांच्या मार्गदर्शना खाली सकाळपासून ही मोहीम राबविण्यात आली. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने सुरू असलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, सिडनी पॉईंटजवळील अनिल विजय मंगावकर यांच्या मालकीचा बंगला आवश्यक परवानगी शिवाय उभारण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. संबंधित बांधकाम नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल विभागाने ते हटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.