नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर(विजय चौगुले):-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मंगळवेढा आगार येथून जत गुडापूर मंगळवेढा पंढरपूर जाणारी एसटी सेवा सुरू करण्यात आली. मंगळवेढा आगारातून जत गुड्डापूर मंगळवेढा पंढरपूर बस सेवा सुरू झाल्यामुळे मार्केट कमिटी तज्ञ संचालक विठ्ठल बापू निकम यांच्या हस्ते चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मार्केट कमिटी तज्ञ संचालक विठ्ठल बापू निकम , डॉक्टर रोहित सावंत , युवा नेते गणेश इंगळे , ग्रामपंचायत सदस्य शिवानंद हाक्के, पत्रकार विजय चौगुले व प्रवासी उपस्थित होते. यावेळी मार्केट कमिटी तज्ञ संचालक विठ्ठल बापू निकम म्हणाले की, गेल्या दोन ते तीन वर्षापासून जत गुडापूर मंगळवेढा पंढरपूर लकडेवाडी माडग्याळ ही एसटी बंद झाली होती . वारकरी संप्रदायाची परंपरा जपणाऱ्या जत तालुक्यातून अनेक भाविक प्रत्येक एकादशीला वारीसाठी पंढरपूरला जातात. मात्र आता त्यांच्या सोयीसाठी मंगळवेढा हून थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरु करण्यासाठी माननीय आमदार समाधान दादा अवताडे यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंगळवेढा आगार फोन करून एसटी सुरू करावी अशी विनंती केली अखेर एसटी बस सेवा सुरू झाली . त्यांच्या प्रयत्नांना यश येत, ही सेवा अखेर सुरू झाली आहे.
