NCT NCT श्री सिद्धेश्वर हायस्कूल जाखापूरचा ९३.७५ टक्के निकाल

श्री सिद्धेश्वर हायस्कूल जाखापूरचा ९३.७५ टक्के निकाल

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- जाखापूर (ता कवठेमहांकळ) येथील श्री सिद्धेश्वर हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून,त्यांच्या या यशाचे परिसरातून मोठे कौतुक केले जात आहे.दहावीसाठी फेब्रुवारी-मार्च-२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेत या शाळेने हे यश त्यांनी संपादन केले.यामध्ये ९३.६० टक्के गुण मिळवून कु अश्विनी राजाराम पाटील ही विद्यार्थीनी शाळेत प्रथम आली आहे.तर कु सेजल विकास गावडे ही विद्यार्थीनी ८५ टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय त्याचप्रमाणे कु स्नेहल गणपतराव पाटील ही विद्यार्थीनीं ८४ टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय आली आहे.त्याचबरोबर कु श्रीमंत सचिन शिंदे ८० टक्के गुण मिळवून चौथा तर कु अजिंक्य आनंद माने हा ७६.८० टक्के गुण मिळवून शाळेत पाचवा आला आहे.
सदर विद्यार्थ्यांस शाळेचे मुख्याध्यापक एम बी माळी,पी व्ही पाटील,यु एम साळुंखे,एस जे पाटील,श्रीमती के एम जाधव,एस जे बाबर,व्ही आर माळी,ए डी बनसोडे ए एस येचवाढ,संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव बोराडे, सचिव राहुल बोराडेसह संस्थेचे पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.