NCT NCT आमदार रोहित(दादा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कवठेमहांकाळ येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर

आमदार रोहित(दादा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कवठेमहांकाळ येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-मा. आमदार रोहित (दादा) आर. आर. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आर. आर. आबा पाटील युथ फाउंडेशन यांच्या वतीने 'लोकनेते स्व. आर. आर. पाटील जनकल्याण आरोग्य शिबिर' या उपक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी भव्य मोफत सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. "वारसा जनसेवेचा... संकल्प आरोग्याचा!" या संकल्पनेतून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे.               हे शिबिर शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे होणार आहे. या शिबिरामध्ये सर्वसाधारण औषधोपचार, बालरोग, दंतचिकित्सा, क्षयरोग, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, स्त्रीरोग व प्रसूती, नेत्ररोग, अस्थिरोग, फिजिओथेरपी, HIV तपासणी व समुपदेशन, आयुष विभागाचे आरोग्य मार्गदर्शन, तसेच ABHA कार्ड व आयुष्मान भारत (गोल्डन कार्ड) नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.                                                  याशिवाय एक्स-रे, ईसीजी, आवश्यक प्रयोगशाळा तपासण्या तसेच कॅन्सर स्क्रीनिंग अंतर्गत पॅप स्मिअर, स्तन तपासणी, प्रोस्टेट कॅन्सरसाठी PSA, CBC, रक्तातील साखर, लिपिड प्रोफाइल, व्हिटॅमिन डी व बी-१२, थायरॉईड प्रोफाइल, युरिक अॅसिड, युरीन तपासणी, LFT व KFT अशा विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. फिजिओथेरपी विभागामार्फत पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, स्लिप डिस्क, सायटिका, फ्रोजन शोल्डर, स्ट्रोकनंतरचे पुनर्वसन तसेच वृद्धांसाठी चालणे व समतोल प्रशिक्षणाबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहे.                                                  शिबिरासाठी येताना आधार कार्ड, आयुष्मान भारत (गोल्डन कार्ड) असल्यास ते, मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड सोबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या समाजोपयोगी उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा स्व. आर. आर. आबा पाटील प्रतिष्ठान, कवठेमहांकाळचे विक्रांत दिलीपराव पाटील यांनी केले आहे.