NCT NCT रविवारी कुंडल येथे वधूवर पालक परिचय मेळावा,उपस्थित वधूंना पैठणी मोफत

रविवारी कुंडल येथे वधूवर पालक परिचय मेळावा,उपस्थित वधूंना पैठणी मोफत

 नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे ):- साता जन्माच्या गाठी तासगांव तसेच कुंडल ग्रामपंचायत कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने जैन मंदिर कुंडल (ता पलूस) येथे रविवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सर्वधर्मीय वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित केला असुन,विवाह इच्छुकांनी तसेच संबंधित पालकांनी वेळेवर उपस्थित राहावून याचा लाभ घ्यावा असे आवाहन साता जन्माच्या गाठी विवाह संस्था तासगांव तसेच ग्रामपंचायत कुंडल यांच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी विवाह इच्छुक वधूना मोफत पैठणी साडी दिली जाणार आहे.                                                        सदर मेळाव्याचे उदघाटन हे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद (भाऊ) लाड यांच्या हस्ते होणार असून,यावेळी सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर जेष्ठ विचारवंत शंकर (दादा ) वैद्य यांचे मार्गदर्शन होणार आहे. या मेळाव्यात प्रथम, घटस्फोटीत, विधूर, विधवा तसेच ज्येष्ठांचा परिचय मेळावा होणार आहे.तरी विवाह इच्छुकांनी येताना फोटो व बायोडाटा घेऊन यावे असे आवाहन साता जन्माच्या गाठी विवाह संस्थेचे सागर पाटील यांनी कळविले आहे.अधिक माहितीसाठी ९७३०३१६४३६,/९५१८९४७२९३ या भ्रमण ध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.